ज्ञानदिप आधार महिला शिक्षण संस्थेची कल्पना २००० साली अस्तीत्वात आली. या संस्थेची संकल्पना ही एक सामान्य गृहीणी सौ. दिपाली आग्रे यांच्या विचारातून प्रत्यक्षात उतरली. त्यानी एका छोट्याश्या जागेमध्ये महिलांना शिवणकला प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. पुढे जाऊन त्यांच्याच विद्यार्थिनीनी त्यांना शिक्षण संस्था सुरु करण्यास प्रोत्साहन केले व अशाप्रकारे २०१२ साली ही संस्था नोंदणी कृत करण्यात आली.

संस्थेने आतापर्यंत पुष्कळ महिलांना व्याव्सायाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयं: रोजारासाठी प्रवृत्त केले आहे.

आमच्या या संस्थेमध्ये कौशल्य विकासावर आधारित विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन महिलांमध्ये कौशल्य विकास कसा होईल याबद्दल विचार केला जातो.